सायंकाळच्या सुमारास दुचाकीने घराकडे परत जात असताना एका सोळा वर्षीय तरुणाचा गळा नायलॉन मांजाने चिरला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यात २६ जानेवारी रोजी लाखांदूर टी पॉईंट चौकातील वनविभाग कार्यालयासमोर घडली. रुद्रक तुळशीदास तोंडरे (१६) रा. लाखांदूर, असे जखमीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “धमक होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?”, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सवाल

हेही वाचा – राज्यात ‘रूफटाॅफ सोलर’ला पसंती, ग्राहकसंख्या ७६ हजारांवर; पाच वर्षांत सौर वीज उत्पादन २० मेगावॅटवरून १३५९ मेगावॅटवर

पाणीपुरी खायला जातो असे वडिलांना सांगून रुद्रक टी पॉईंट चौकात आला. पाणीपुरी खाऊन झाल्यावर तो दुचाकीने घराकडे परत जात असताना तुटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यावर आला. गळ्यावर काही तरी लटकल्याचा भास होताच रुद्रकने दुचाकी थांबवली. मात्र, नायलॉन मांजाने रुद्राच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाल्याने रुद्रक रडत होता. यावेळी वन विभागाचे वनरक्षक अधिकारी एस.जी. खंडागळे यांच्या हा प्रकार लक्षात येताच खंडागळे यांनी त्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्याच्या गळ्याला १६ टाके लागले असून आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 16 year old boy throat slit with a nylon manja in bhandara ksn 82 ssb