नागपूर : बिहार मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आरोपीकडून एक पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आले.मो. तनवीर मो. मंजूर (32) असे आरोपीचे नाव आहे. बिहार मधील भागलपूर न्यायालयात आरोपी तनवीर ला १७ मे ला बिहार पोलिस घेऊन जात असताना त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. तेथून तो थेट कोलकत्ता येथे गेला. त्यानंतर तो नागपुरात आला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात तो भाड्याने राहत होता. तहसील पोलिसांना माहिती मिळताच आज सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2022 at 03:38 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of bihar bomb blast arrested in nagpur zws