नागपूर : नामिबिया येथून भारतात आणलेल्या पहिल्या तुकडीतील आठ चित्त्यांपैकी ‘साशा’ या चित्त्याचा सोमवारी किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘साशा’चा मृत्यू झाला. यामुळे भारतात चित्ता परत आणण्याच्या मोहिमेला ‘ब्रेक’ तर लागणार नाही ना, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर २०२२ ला नामिबिया येथून आठ चित्ते भारतात आणण्यात आले. मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनाे राष्ट्रीय उद्यानात सुमारे महिनाभराहून अधिक काळ त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना मोठ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर पहिल्या तुकडीतील चार चित्ते कुनोच्या मोकळ्या जंगलात सोडण्यात आले. मात्र, साडेचार वर्षाहून अधिक वयाची मादी चित्ता ‘साशा’ मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आजारी होती. कधी तीच्या तब्येतीत सुधारणा होत होती, तर कधी ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती.

हेही वाचा >>> अमरावती : बाराशे रुपयात एक ब्रास वाळू घरपोच! विखे पाटील म्हणाले, तीन महिन्यांत…

मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ती आजारी होती. त्यामुळे उपचारासाठी तिला कुनो राष्ट्रीय उद्यानातील विलगीकरणाच्या पिंजऱ्यात परत आणले होते. कुनो राष्ट्रीय उद्यानातील डॉक्टरांच्या चमुने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी तिचे निधन झाले. त्यामुळे भारतात चित्ते परत आणण्याच्या मोहीमेला ‘ब्रेक’ लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या चार चित्त्यांना कुनोच्या मोकळ्या जंगलात सोडण्यात आले, ते त्याठिकाणी स्थिरावल्याचे मध्यप्रदेश वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of cheetah in kuno national park breaks bring cheetah back to india rgc 76 ysh