नागपूर : भारतीय हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. कालपासूनच राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पुढील ४८ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सोबतच राज्यात नऊ आणि दहा तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण, गोवा, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : नागपुरात रुग्ण भर पावसात उघड्यावर! मेडिकल रुग्णालय परिसरात चालले काय?

राज्यावर आज हवामानाच्या तीन स्थिती सक्रिय आहेत. वाऱ्याची चक्रीय स्थिती ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडवर प्रभावी आहे. मान्सूनची द्रोनिका स्थिती दक्षिणेकडे असून इंदूर आणि बैतूलवरून जात आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा हा १९ डिग्री उत्तरेकडे तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in the state today and tomorrow in konkan goa and vidarbha orange alert rgc 76 css