बुलढाणा : जिल्हा व पोलीस मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील गणेश विसर्जन आटोपल्यावर मलकापूर मार्गावर काल संघर्ष उडाला. सुमारे बारा जणांच्या समूहाने सहा ते सात जणांना बेदम मारहाण केली असून जखमींना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आज बुलढाणा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी आरोपी विजय दुरने, कैलास माळी, राज पवार, संकेत सरोजकर यासह अज्ञात ७ ते ८ आरोपींविरुद्ध आज शुक्रवारी गुन्हे दाखल केले. अतिक उर्फ शहेबाज खान हाफिज खान ( २३, राहणार इकबाल नगर, बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी अतिक हा काल गुरुवारी मलकापूर मार्गावरील सावळे पेट्रोलपंप जवळच्या टपरीवर आपला मित्र साहिल खान, रियाज खान सोबत चहा पित होता.

हेही वाचा : अनंत चतुर्दशीला चक्क नारळातून निघाले गणपती, भक्ताच्या घरी दाखवला चमत्कार

यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी वाद घातला. यावर अतिक याने आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलविले. यावेळी तिथे आलेल्या साजिद, वसीम, सोहिल, जावेद यांच्यासह अतिक आदींना आरोपींनी मारहाण केली. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana brawl erupts during ganesh visarjan 6 injured admitted in hospital scm 61 css