गडचिरोली : तू बिनकामाची असून आमच्यावर ओझे आहेस, असे म्हणून नातवाने वयोवृद्ध आजीची काठीने मारहाण करून हत्या केली. आज शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे ही क्रुरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली. तराबाई पांडुरंग गव्हारे (७५) असे हत्या झालेल्या अजीचे नाव असून याप्रकरणी आरोपी नातू भाऊराव मनोहर कोठारे याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या नवतळा गावात कोठारे कुटुंबीयांसोबत बऱ्याच वर्षांपासून मृत आजी ताराबाई राहत होत्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास आरोपी नातू भाऊराव हा घरी येऊन आपल्या आई वडिलांना शिवीगाळ करू लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वडिलांनी आईकडून मुलाचा ताबा घेणे अपहरण नाही, उच्च न्यायालय म्हणाले…

दरम्यान, जवळच बसून असलेल्या वयोवृद्ध आजीवर त्याचे लक्ष गेले. त्याने तिला तू दिवसभर घरी बसून असते, आमच्या घरचे खाते असे म्हणून काठीने मारहाण सुरू केली. भाऊरावने निर्दयपणे केलेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता आरोपी नातूने पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून आरोपी नातू भाऊरावला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli grandson killed grandmother by saying her workless and burden on the family ssp 89 css