नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे एक्सप्रेस दोन दिवस रद्द

जाणून घ्या कारण; निझामुद्दीन ते भुसावळ एक्सप्रेस आणि इतर पार्सल गाड्या इटारसी, नरखेड, चांदूरबाजार आणि बडनेरा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

नागपूर : महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे एक्सप्रेस दोन दिवस रद्द
(संग्रहीत छायाचित्र)

वर्धा ते चिटोडा दरम्यान दुसरी कार्ड रेल्वे मार्ग टाकण्यात येत असल्याने वर्धा यार्डमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. तसेच सिग्नलिंग बदलण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये वर्धा ते नागपूर आणि नागपूर ते वर्धा मेमू (१९ आणि २० ऑगस्ट), वर्धा ते बल्लारपूर आणि बल्लारपूर ते वर्धा मेमू (१९ ते २१ ऑगस्ट), अमरावती ते वर्धा आणि वर्धा ते अमरावती मेमू (१९ ते २१ ऑगस्ट), कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (१९ ऑगस्ट), गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (२० ऑगस्ट), कोल्हापूर ते नागपूर एक्सप्रेस (१९ ऑगस्ट) आणि नागपूर ते कोल्हापूर एक्सप्रेस (२० ऑगस्ट), पुणे- काझीपेठ एक्सप्रेस (१९ ऑगस्ट), काझीपेठ ते पुणे एक्सप्रेस (२१ ऑगस्ट), अजनी ते अमरावती एक्सप्रेस (१९ ऑगस्ट), अमरावती ते अजनी एक्सप्रेस (२० ऑगस्ट) आदींचा समावेश आहे.

निझामुद्दीन ते भुसावळ एक्सप्रेस आणि इतर पार्सल गाड्या इटारसी, नरखेड, चांदूरबाजार आणि बडनेरा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारतात चित्ता आणण्याच्या तयारीला वेग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी