गोंदिया: यापूर्वी दिव्यांग बांधवांच्या तक्रारींची सुनावणी होत नव्हती. पण आता दिव्यांग बांधवांच्या तक्रारींकरिता संपूर्ण राज्यभर मी फिरत आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या तक्रारींतून ३ डिसेंबरपर्यंत एक नवीन धोरण आम्ही तयार करणार आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दिली. ते गोंदिया येथे जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे उद्घाटक म्हणून आले असता माध्यमांशी बोलत होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तुम्ही दिव्यांग श्रेणीत आहात? तलाठी व्हायचंय? मग हमीपत्र…

कडू म्हणाले, महाराष्ट्रभर या संदर्भात दौरे करीत असताना एक बाब प्रकर्षाने जाणवली की कोणत्याही तालुक्याला मंडळ नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना जिल्हा कार्यालयात येऊन प्रमाणपत्र घ्यावे लागते. या संदर्भात सीईओ आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून शिबिरातून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रमाणपत्र वितरण करता येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New policy for persons with disabilities till 3rd december says mla bachchu kadu sar 75 zws