गोंदिया : चलन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे गेलीच पाहिजे, २००० ची नोट हा काही कागदाचा तुकडा नसून चलन आहे, ती चाललीच पाहिजे, जर ती चालत नसेल आणि व्यापार्यांच्या गोडाऊनच्या सौंदर्यात भर घालत असेल, अवैध साठमारी करण्याच्या कामी येत असेल तर ते बंद करणेच योग्य. रिझर्व्ह बँकेने वर्तमान बाजार व आर्थिक परिस्थिती अभ्यासूनच २००० ची नोट बंद करण्याचे ठरविले आहे. विरोधकांनी यावर बोंबाबोंब ठोकून काहूर माजवू नये, असे मत वन,पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
शनिवारी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणीचे स्थानांतरण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, की अमेरिकेने २००६ पूर्वीचे चलनात असलेले सर्व डॉलर बंद केले होते.तेव्हा तेथील विरोधी पक्षांनी अश्या प्रकारे बोंब ठोकली नव्हती. २००० च्या नोटाबाबत संसदेत चर्चा झाली तेव्हा काँग्रेस च्या नेत्यांनी सांगितले होते की या नोटा बाजारात दिसत नसून गायब झाल्या की करण्यात आला. त्यामुळे या नोटाना बंद करण्यात यावे. आता एक वर्षानंतर तेच नेते एखाद्या अर्थशास्त्रीसारखे या बंदी वर भाष्य करत सर्वसामान्यांना यात सहभागी करताना दिसत आहेत. पण यामुळे घाबरायच कारण नाही. या नोटबंदीचा सर्व सामान्य लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही. 3
हेही वाचा >>> चंद्रपूर : “ग्रामस्थांनी वाघाला ठार मारले तर…”, वडेट्टीवार म्हणाले,’ वनमंत्र्यांनी…’
सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची संधी आहे. पण अवैधरित्या साठमारी करून ठेवली असेल तर मात्र काही खरं नाही. राज्यात भाजपचे सरकार आले त्यानंतर जातीय दंगलीत वाढ झाली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, की ते असे नाही बोलणार तर भाजप चांगले काम करीत आहे असे बोलणार का? आजघडीला हेच त्यांचं काम राहिले आहे. कधी म्हणतात आर. डी.एक्स. घेऊन आले, पण ते एक आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करत नाही ,तुमच्याकडे याबाबत काही माहिती,पुरावा असेल तर तो पोलिसांना द्यायचा हे काम नाही का त्यांचा. पटोले नागरिकशास्त्र शिकलेले नाही का ? या प्रसंगी खा. अशोक नेते, सुनील मेंढे उपस्थित होते.