नागपूर: तब्बल दोन वर्षानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा बुधवारी २९ जून रोजी वाजणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार  असून या दिवशी शाळेत येणाऱ्या मुलांचे गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाईल. जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी १० ते दुपारी ५:१५ पर्यंत असून अनुदानित व काही खाजगी शाळांची वेळ दुपारी १२ ते १२:३० पर्यंत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनामुळे दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यानंतर प्रथमच  शाळा वेळेवर सुरू होत आहेत. मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करण्याचे आणि अभ्यासात मागे पडलेल्या मुलांची  शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे मोठे आव्हान शिक्षकांना पेलावे लागण्णार आहे. तसेच  घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळेच्या वातावरणात स्वत:ला रुळवून घ्यावे लागणार आहे. मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे.

पालकांनी अशी घ्यावी काळजी

शाळेत पाठवताना पालकांनी मुलांसोबत पाण्याची बाटली, मुखपट्टी, जेवणाचा डबा द्यावा. शाळेतून घरी आल्यानंतर मुलांचे कपडे व हातपाय स्वच्छ धुवावेत, आजारी असल्यास मुलाला शाळेत पाठवू नये.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School open in vidarbha from june 29 zws