नागपूर: नागपूर महापालिका हद्दीत विविध सिमेंट मार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे  नऊ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून सिमेंट मार्गाच्या बांधकामासाठी मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पूलापर्यंत), देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानन नगर, भारत पेट्रोल पंप (जॉगर्स पार्क – सावरकर गार्डन) फुटबाल गाऊंड पर्यंत, जय दुर्गा ट्रेवर्ल्स ते आरबीआई कॉलोनी, जयप्रकाश नगर, न्यू स्नेह नगर खामला रोड ते मालवीय नगर, निरी रोड ते आठ रस्ता चौक वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले गेले आहे. 

हेही वाचा >>> “महायुतीला भरघोस यश मिळणे अशक्य,” बच्चू कडूंचा घरचा अहेर; म्हणाले…

आदेशानुसार, महापालिकेकडून मार्ग क्र. ३३ मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. मार्ग क्र. ३३ मधील मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्त्यावरील गर्ग यांच्या घरापासून सुदाम यांच्या घरापर्यंत व मैदानापासून ते घुले यांच्या घरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येत आहे. शिवाय  हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक,   खरे मार्ग, धंतोली विजयानंद सोसायटी ते दीनानाथ शाळे पर्यंत देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानन नगर, भारत पेट्रोल पंप (जॉगर्स पार्क – सावरकर गार्डन) फुटबाल गाऊंड पर्यंत, जय दुर्गा ट्रेवर्ल्स ते आरबीआई कॉलोनी – जयप्रकाश नगर, न्यू स्नेह नगर खामला रोड ते मालवीय नगर, निरी रोड ते आठ रस्ता चौक सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. या रस्त्यावरील सर्व वाहतुक वळविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> सिमेंटचा वीज खांब अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू; यवतमाळच्या फुलसावंगी येथील घटना

कंत्राटदारांना महापालिकेकडून आदेश

नागपूर महापालिकेकडून कंत्राटदाराला काम करणाऱ्या मार्गावर स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला फलकही लावायचा आहे. सोबत पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले  सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमावे. काम सुरू झाल्यानंतर जमिनीतुन निघणारे मटेरियल उदा. माती, गिट्टी, पेव्हर ब्लॉक, वगैरे मुळे घसरण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकु नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवून त्यावर  रोड पूर्ववत करावा.  पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी व काम करणार आहे. त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत (वळण मार्ग) सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरिता एलईडी डार्यव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीकेटींगवर एलईडी माळा लावणे आवश्यक आहे, काम सुरू असतांना अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलीसांनी दिलेल्या दिशा- निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आदेश महापालिकेने कंत्राटदाराला दिले आहे.