बुलढाणा : ‘पीपीएफ’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई | Two detained on suspicion of being related to 'PPF' organization, preventive action against 11 supporters buldhana | Loksatta

बुलढाणा : ‘पीएफआय’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई

दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले असता तिथे काही जणांनी गर्दी केली.

बुलढाणा : ‘पीएफआय’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई
बुलढाणा : ‘पीपीएफ’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघे ताब्यात, ११ समर्थकांवर प्रतिबंधक कारवाई

देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या कारणावरून देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक कारवाई करीत आहे. आज बुलढाणा शहरातून दोघांना या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस यंत्रणांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या कारवाईचा निषेध करणाऱ्या ११ समर्थकांविरुद्ध शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. यामुळे कारवाईचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. अकोला ‘एटीएस’च्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणले असता तिथे काही जणांनी गर्दी केली. या कारवाईचा निषेध करणाऱ्या ११ जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, देशविरोधी व्यक्तव्य करून पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज २७ सप्टेंबर रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुणे येथील घटनाक्रम संदर्भात कारवाईची मागणी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

संबंधित बातम्या

बापरे! चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO
ख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या
मान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त
नागपूर : अधिकाऱ्यांपेक्षा निवृत्त अधिकाऱ्यांचे सभासद शुल्क दुप्पट
नागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित
“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’
“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं?” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”
वसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का? पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण