न्याय न मिळाल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापुढे हनमान चालिसा पठणाचा इशारा देताच प्रशासन हलले व आंदोलकाना त्यांच्या मागण्या मान्य करण्या बाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: शेतातील गुप्तधनाची आस, तांत्रिकांद्वारे मध्यरात्री मंत्रपाठ…

वर्धेतील बचतगटाशी संबंधित काम करणाऱ्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांच्या वेतनाचा प्रश होता. त्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठीज्ञउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापुढे सोमवारी हनुमान चालिसा पठाण करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी आंदोलनासाठी कूच करताच त्यांना पोलिसांनी रोखले होते. त्यानंतर वर्धेत बुधवारी बैठक झाली. बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पण ती वेळच आली नाही. बुधवारी लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा >>>नागपूर : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बालकाला घरी नेले आणि….

युवा परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले, गट प्रभाग व्यवस्थापक महिलांचे मानधन पूर्वी ३ ते ५ हजार होते. आता त्यांचे नवीन करार १० हजार मासिक प्रमाणे होणार आहे. या महिलांना १०१९ पासून ५ टक्के मानधनात वाढ, नवीन करारही ५ टक्के मानधन वाढीसह मिळणार आहे. या सगळ्या मुद्यांवर वर्धेतील बैठकीत महाराष्ट्र राज्य जीवनउन्नती अभियान आणि इतरही विभागातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली होती. बुधवारी संध्याकाळी शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे हे आंदोलन स्थगित करत आहोत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of hanuman chalisa chanting in front of devendra fadnavis house mnb 82 amy