scorecardresearch

नागपूर : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बालकाला घरी नेले आणि….

आईने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्टँनलीला अटक केली.

sexually assaulted child by luring with chocolates
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

घरासमोर खेळणाऱ्या मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून एका नराधम युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल आरोपीला अटक केली. स्टँनली सिल्वेस्टन जोसेफ (२९, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. तो  गुन्हेगारी प्रवृत्तीचा व विकृत असून त्याच्याबाबत वस्तीत तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> चंद्रपूर: नोकरीची संधी, नव्या १४९ पदांना शासनाची मान्यता!

मंगळवारी दुपारी अडीच वाजता वस्तीत राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा मुलगा घरासमोर खेळत होता.  स्टँनलीने त्याला  चॉकलेट आणि १० रुपये दिले. त्याला आणखी चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेले. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.  काही वेळाने मुलगा रडत घरी आला. त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला.  आईने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्टँनलीला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 17:39 IST