Premium

विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…

रजतनगरी म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळख असलेल्या खामगाव शहराचा मानाचा गणपती लाकडी आहे.

wooden Ganesha in Vidarbha
सराफा बाजारमधील एका छोटेखानी मंदिरात ही मूर्ती विराजमान आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: रजतनगरी म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळख असलेल्या खामगाव शहराचा मानाचा गणपती लाकडी आहे. विदर्भातील आणि बहुधा राज्यातील एकमेव काष्ठ गणपती असून त्याला शतकीय पार्श्वभूमी आहे.

देशपातळीवरील ‘सेलिब्रेटी’नी खामगाव येथून शुद्ध चांदीच्या वस्तू, मुर्त्या बनवून घेतल्या आहे. नुकतेच जालना येथील अनोखा गणेश मंडळाने येथील विश्वकर्मा ज्वेलर्स कडून १०५ किलोची चांदीची मूर्ती तयार करून घेतली. मात्र, येथील मानाचा गणपती मात्र लाकडी असणे हा योगायोग आहे. अर्थात लाकडी मूर्तीवरील दागिने मात्र चांदीचे आहेत. या मूर्तीला कमीअधिक १२० वर्षे झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरज अग्रवाल यांनी दिली. खामगावात व्यवसायनिमित आलेल्या दाक्षिणात्य अय्यप्पा(आचारी) मंडळींनी दहा दशकापूर्वी ही सुबक मूर्ती तयार करवून घेतली.

आणखी वाचा-ही तर हद्दच झाली! चक्क स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन ‘एमपीएससी’ची प्रश्नपत्रिका फोडली

सराफा बाजारमधील एका छोटेखानी मंदिरात ही मूर्ती विराजमान आहे. खामगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हा मानाचा लाकडी गणपती अग्रभागी असतो. मात्र, या मूर्ती ऐवजी अन्य (स्थापना) मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. विसर्जन पार पडल्यावर लाकडी मूर्तीची मंदिरात पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. गणेशोत्सव साठी प्रसिद्ध खामगावमधील गणेश दर्शन लाकडी गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wooden ganesha in vidarbha that does not undergo immersion scm 61 mrj

First published on: 21-09-2023 at 16:58 IST
Next Story
अकोला : कृषी विद्यापीठात २० एकरावर साकारणार जिवंत पीक प्रात्यक्षिके; एकाच ठिकाणी २१० विविध पिकांच्या जाती, यंदा प्रथमच शिवार..