लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : सिन्नर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बालकामगारांना बालगृहात पाठवले आहे.

सिन्नर बस स्थानक परिसरात आई सप्तश्रृंगी वडापाव सेंटर हे सुदर्शन नाईक यांचे छोटे दुकान आहे. या ठिकाणी १३ वर्षांचा बालक हा काम करत असल्याची तक्रार कामगार उपआयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित बालकामगाराची सुटका करण्यात आली. संबंधित बालकाला कमी वेतन देत त्याच्याकडून जादा श्रमाचे काम करून घेतले जात होते. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-इगतपुरीतील शेती नुकसान पाहणी दौऱ्यात विनायक राऊत यांची टीका; म्हणाले, “सरकार पळपुटे…”

सिन्नर येथील पंचवटी मोटेल्स उडपी तडका येथे काम करणाऱ्या दोन बालकामगारांचीही सुटका करण्यात आली. त्यात नेपाळ येथील १३ वर्ष पाच महिने वयाच्या आणि १२ वर्ष, पाच महिने, आठ दिवस वयाच्या बालकांचा समावेश आहे. सिन्नर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित सुरेश पुजारी, रवीश मुल्की यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three child laborers rescued from sinnar mrj