scorecardresearch

Premium

इगतपुरीतील शेती नुकसान पाहणी दौऱ्यात विनायक राऊत यांची टीका; म्हणाले, “सरकार पळपुटे…”

आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

Vinayak Rauts criticism during agricultural damage inspection tour in Igatpuri
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
Uddhav Thackeray criticized PM Modi
शेतकऱ्यांना हमीभाव नाही अन् गद्दारांना ५० खोक्यांचा भाव, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray Group
“शेतकऱ्यांना चक्रव्यूहात ठेवून पंतप्रधान अलहान मोदीच्या आत्मनंदात”, शेतकरी आंदोलनावरून ठाकरे गटाची टीका
study group report recommended many benefits for maharashtra loom owners zws 70
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 

खासदार राऊत यांनी इगतपुरी तालुक्यातील वाघेरे, पाडळी, गोंदे, वाडीव-हे आदी गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिस्थिती भीषण आहे. ही परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आले. भात पीक आणि बागायती पिकाची मोठी हानी झाली असून या वर्षी दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांकडे नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही सर्व बांधावर जाऊन पाहणी करत आहोत, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी, उध्दव ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खरोखर मदत मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी देखील हे मान्य केले की, ठाकरे सरकारच्या काळातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली. या सरकारच्या काळात मात्र मदत मिळाली नाही. दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी गावित यांनी केली.

आणखी वाचा-‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ विरोधात मालेगावकर आंदोलनाच्या पवित्र्यात

या दौऱ्यात नितीन पानगुडे पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख भगवान आडोळे आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinayak rauts criticism during agricultural damage inspection tour in igatpuri mrj

First published on: 29-11-2023 at 18:26 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×