महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.तसेच शहरात विविध ठिकाणी शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबईकरांना दिलासा; १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च कालावधीतील थकीत मालमत्ता करावर ६० टक्के सूट देणारी अभय योजना लागू

वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक पालिकेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे अभिमानाने समूह गायन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने आजपासून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे कविवर्य राजा बढे लिखित गीत महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून अंगीकृत केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाच्यावतीने राज्यगीताचे समूहगान करण्यात आले.

हेही वाचा- नवी मुंबई : उरण बाह्यवळण रस्त्याला विरोध; अटक केलेल्या ३० मच्छिमारांची जामिनावर सुटका

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगीही महाराष्ट्राच्या राज्यगीताचे समूह गायन करण्यात आले.

हेही वाचा- नवी मुंबईतील इ-टॉयलेट संकल्पना अयशस्वी, पारंपरिक शौचालय बांधण्याचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐरोली येथील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने व इतर अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्याची वैचारिक परंपरा जपत आज पोवाडे आणि शाहिरी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर रूपचंद चव्हाण आणि सहकाऱ्यांनी ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा दमदार कार्यक्रम सादर करीत छत्रपती शिवरायांना स्वरवंदना अर्पण केली व उपस्थितांची मने जिंकली. याचप्रमाणे शहरात विविध संस्था व मंडळे यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Group singing of rajya geet on the occasion of shivjayanti in navi mumbai dpj