नवी मुंबई : जून महिना पावसाविना गेल्याने यावर्षी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी पातळी पाच मीटरने कमी झाली होती. यामुळे नवी मुंबईवर एक तास पाणी कपातीची वेळ आली होती. मात्र गेली दहा दिवस शहरासह मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने सरासरी गाठली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई शहरात आतापर्यंत ११३५ तर मोरबे पाणलोट क्षेत्रात ११४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने सरासरी गाठल्याने खालावलेली धरण पातळी वाढली असल्याने शहराला दिलासा मिळाला आहे.

मोरबे धरण परिसरात  पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढेच पाणी धरणात शिल्लक होते.  धरण भरण्यासाठी ४००० मिमी. पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे आहे त्या पाणीसाठय़ाचे नियोजन करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. सायंकाळी विभागनुसार एक तास पाणीकपातीचा प्रस्तावही करण्यात आला होता. मात्र ४ जुलैपासून शहर व धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी वाढली आहे. मोरबे धरण गेल्या वर्षी दमदार पावसाने २९ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर गेली काही दिवस पाऊस पडत आहे. आतापर्यंत पाणलोट क्षेत्रात ११४९ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरम्णक्षेत्रात १००९ मिमी. पावसाची नोंद झाली होती. स्थिती समाधानकारक  आहे. मात्र धरण भरेल की नाही याबाबत साशंकता असल्याचे  कार्यकारी अभियता वसंत पडघन यांनी सांगतिले. 

पाणीपातळी

२०२१-२२ – ७४.७८ मीटर

२०२२-२३ – ७५.०५ मीटर

सरासरी पाऊस

४ जुलै- १४९.६० मिमी.

५ जुलै-१०९.४० मिमी.

६ जुलै- १५१.२० मिमी.

७ जुलै- १६८.२० मिमी.

८ जुलै- ६२.४० मिमी.

९ जुलै- ६९.८० मिमी.

१० जुलै- ६८.६० मिमी.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai catchment area of morbe dam receives rain above average zws