नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चय केला आहे. पहिला नंबर हे ध्येय नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरु केली आहे. नवी मुंबईच्या आजवरच्या यशात स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचा महत्वाचा वाटा असून २०२३ च्या स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील नागरिक, विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून सहभाग घेत आहेत. याच अनुषंगाने दि. ११ मार्च २०२३  रोजी बेलापूर मध्ये शिवमंदिर सागरी किनारा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी युथ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र सोनवणे, स्वच्छता अधिकारी पवन कोवे, बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग ,साफसफाई कामगार तसेच मँगोज सोल्जरचे सदस्य, ज्ञानदीप स्कूल व कॉलेजचे विद्यार्थी, फादर एंगल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज वाशी, एस आय इ एस कॉलेज नेरूळ, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज आदी  कॉलेज मधील एन एस एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai cleanliness campaign by youth in belapur ysh