scorecardresearch

पाककला स्पर्धेचे नियम व अटी

पाककला स्पर्धेचे नियम व अटी

ही स्पर्धा — ऑगस्ट २०१८ ते — ऑक्टोबर २०१८ या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

१. सहभाग कसा घ्याल?

indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala इथे भेट द्या.

  • नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
  • तुमची वैयक्तिक माहिती नोंदणीच्या अर्जामध्ये भरा (नाव, ई-मेल आयडी, संपर्काचे फोन नंबर व पत्ता इ.)
  • तुमची पाककृती ‘वर्ड डॉक’ या फॉरमॅटमध्ये सबमिट करा. सोबत खाद्य पदार्थाचा फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करा.
  • व्हिडिओ दिल्यास जास्त चांगले, अशा स्पर्धकाची स्पर्धेसाठी निवड होण्याची व प्रवेश स्वीकारला जाण्याची शक्यता वाढेल.

२. पात्रतेचे निकष

  • स्पर्धेत सहभागी झालेल्यांना नियम व अटी विनाशर्त मंजूर आहेत असं गृहीत धरण्यात येईल. ही स्पर्धा महाराष्ट्रात निवास असणाऱ्या १८ वर्षांवरील व्यक्तिंसाठी खुली आहे. लोकसत्ताचे तसेच या स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या ब्रँड्सचे कर्मचारी बक्षीसांसाठी अपात्र असतील.
  • स्पर्धेत प्रवेश मोफत असून कुठल्याही उत्पादनांच्या खरेदीची अट नाही याची नोंद घ्यावी.
  • सादर केलेली पाककृती सहभागी स्पर्धकाची स्वत:ची असावी.

३. स्पर्धेचे सर्वसाधारण नियम

  • स्पर्धेत प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी पाककृती — ऑक्टोबर २०१८ पूर्वी सबमिट करणे बंधनकारक आहे.
  • प्रत्येक स्पर्धकासाठी तीन पाककृतींची मर्यादा आहे.
  • खाद्यपदार्थ शाकाहारी असावा आणि तो बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे.
  • खाद्यपदार्थाचे नाव आधी द्यावे मग खाली साहित्य आणि पाककृती लिहावी.
  • सहभागी स्पर्धकानं नाव, संपर्काचे क्रमांक, पत्ता व ईमेल आयडी नमूद करावा. वैयक्तिक माहिती गोपनीय राखण्यात येईल व पूर्वमंजुरीशिवाय ही माहिती कुणालाही देण्यात येणार नाही.
  • पाककला स्पर्धेच्या विजेत्यांची निवड लोकसत्ताची ‘पाक कृती टीम’ करेल.

४. विजेत्यांची निवड व घोषणा

  • आठवड्याचे विजेते : दर आठवड्याला दोन विजेत्यांची निवड करण्यात येईल, तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण २४ विजेते निवडले जातील. या विजेत्यांची निवड पाककृती व साहित्याच्या वैशिष्ट्यांचा विचार करून लोकसत्ताची ‘पाककृती टीम’ करेल. या निवड झालेल्या विजेत्यांच्या घरी लोकसत्ताची टीम भेट देईल आणि त्यांच्या पाककृतीचं व्हिडीओ शुटींग करण्यात येईल.
  • महाविजेता : तीन महिन्यांनंतर सर्व विजेत्यांच्या पाक कृतीचे व्हिडीयो indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala येथे अपलोड करण्यात येतील व ते वाचकांच्या / दर्शकांच्या मतदानासाठी खुले असतील. ज्या स्पर्धकाच्या पाककृतीला सर्वाधिक मतं मिळतील त्याला महाविजेता म्हणून घोषित करण्यात येईल. महाविजेतेपदाच्या शर्यतीतील स्पर्धक त्यांच्या पाककृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रमोट करू शकतात, आप्तेष्टांना मतदानाचं आवाहनदेखील करू शकतात व जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. महाविजेत्याची निवड केवळ मतांच्या आधारावर असेल आणि या निवडीमध्ये लोकसत्ताच्या ज्युरींचा कुठलाही हस्तक्षेप नसेल.
  • आठवड्याचे विजेते व महाविजेता यांना ईमेल द्वारे तसेच मोबाईलवर एसएमएस द्वारे कळवण्यात येईल. आठवड्याच्या विजेत्यांनी त्यांची संमती कळवल्यानंतर तसेच घरचा पत्ता, संपर्क आदीची माहिती दिल्यानंतर लोकसत्ताची टीम व्हिडीओ शूट करण्यासाठी त्यांच्या घरी भेट देईल.
  • विजेत्यांना एक आठवडा आधी लोकसत्ता टीमच्या भेटीची पूर्वसूचना देण्यात येईल.

बक्षीसे :

आठवड्याची बक्षीसे : एक्सक्लुझिव्ह गिफ्ट हँपर्स (**स्पॉन्सर ब्रँडच्या माहितीसह)
महाबक्षीस : सहकुटुंब ४ दिवस ३ रात्र गोव्याची टूर (** स्पॉन्सर ब्रँडच्या माहितीसाठी)

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×