-
ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी आपल्या ७०व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी १५ जानेवारीला परवीन दोसांजशी लग्न केले. कबीर बेदी यांचे हे चौथे लग्न आहे. कबीर बेदी यांच्या या आधीच्या पत्नींची छायाचित्रे पुढील स्लाइडमध्ये…
-
या आधी कबीर बेदींनी तीन लग्न केली. पूर्वाश्रमीतील मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदीशी त्यांनी पहिले लग्न केले. पूजा बेदी आणि सिद्धार्थ ही त्यांची दोन अपत्ये.
-
मुलगी पूजाने चित्रपटसृष्टीत नाव कमवले. 'बिग बॉस'च्या दुसऱ्या सत्रात ती सहभागी झाली होती. मुलगा सिद्धार्थ सिजोफ्रेनियाग्रस्त आहे. १९९७ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये शिक्षण घेत असताना सिद्धार्थने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
-
गतकाळची प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी आणि त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. या कारणास्तव पत्नी प्रोतिमाने त्यांच्यापासून फारकत घेतली होती. त्यानंतर प्रोतिमाने परत लग्न केले नाही तर कबीर बेदी यांनी ब्रिटीश फॅशन डिझायनर सुझान हमफ्रेझशी लग्न केले.
-
कबीर आणि सुझानला अॅडम नावाचा मुलगा आहे. अॅडमने "हॅलो? कौन है!" चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या छायाचित्रात अॅडम वडील कबीर बेदी, सावत्र बहीण पूजा आणि पत्नी निशा हरालेसह दिसत आहे.
-
१९९० नंतर कबीर बेदींनी सुझानला घटस्फोट देऊन टीव्ही आणि रेडिओवर सूत्रसंचालन करणाऱ्या निक्की बेदीसोबत (उजवीकडील) संसार थाटला. या दोघांचे मुलबाळ नसून, या लग्नाचादेखील २००५ मध्ये पूर्णविराम झाला.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार