-
छोट्या पडद्यावरील 'सिया के राम' मालिकेत हनुमानाचे आगमन होणार असून, कुस्तीपटू दानिश अख्तर सैफी हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हनुमानाच्या भूमिकेबाबत उत्साही असलेला दानिश लकरच चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या आशीर्वादामुळेच आपली या भूमिकेसाठी निवड झाल्याचे दानिशचे म्हणणे आहे. (सौजन्य – फेसबुक)
-
सर्व काही स्वप्नवत असून आपण कधी अभिनयच्या क्षेत्रात येऊ असे वाटले नव्हते. मालिकेचे दिग्दर्शक निखिल सिन्हा यांनी मला एका कुस्ती सामन्यादरम्यान पाहिले होते. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधून त्यांची मनिषा बोलून दाखवली. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका साकारत आहे. भूमिका उत्तमरित्या पार पाडण्यासाठी अभ्यास करत असून, गेल्या तीन महिन्यांपासून अभिनय सुधारण्यावरदेखील भर देत असल्याचे त्याने सांगितले. (सौजन्य – फेसबुक)
-
रामायणातील हनुमान ही दानिशची सर्वात आवडती व्यक्तीरेखा असल्याने ही भूमिका साकारणे त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. मालिकाकर्त्यांकडून तीन महिने त्याच्या लूकवर काम करण्यात आले, आता हैदराबादमध्ये चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. (सौजन्य – फेसबुक)
-
दानिशचे गुरू खली हे देखील भगवान हनुमानाचे भक्त असून, ते सतत आपल्याजवळ हनुमान चालीसा ठेवतात. शाकाहार घेणारा दानिश अधिक मात्रेत पौष्टिकता मिळविण्यासाठी अंड्यांचे सेवन करतो. (सौजन्य – फेसबुक)
-
मूळ बिहारमधील असलेल्या दानिशने दी ग्रेट खली आणि महान कुस्तीपटू संग्रामसोबत काम केले आहे. सहा फूट सहा इंच उंचीच्या दानिशचे वजन १३० किलो आहे. (सौजन्य – फेसबुक)
-
सकाळी सात वाजता उठणारा दानिश फळांचे सलाड खाऊन दिवसाची सुरुवात करतो. दिवसभरात पाच लिटर दूध पितो, तर ४५० ग्रॅम तूपाचे सेवन करतो. जवळजवळ ५०० ग्रॅम सुकामेवा खातो. जेवणात आमटी-भात, पनीर आणि ग्रीन सलाड सेवन करतो. रोज सहा ते आठ तास व्यायाम आणि कुस्तीचा सराव करतो. (सौजन्य – फेसबुक)
-
सिया के राम मालिकेतील अभिनेत्री संपदा वाजबरोबर दानिश अख्तर.
-
दानिशची WWE साठी निवड झाली होती, परंतु, विसा मिळण्यात अडचणी आल्याने तो जाऊ शकला नाही. भविष्यात संधी मिळाल्यास जायला नक्की आवडेल असे त्याचे म्हणणे आहे. (सौजन्य – फेसबुक)
-
अभिनेत्री सोनाली बेंद्रेसमवेत दानिश अख्तने काढला सेल्फी.(सौजन्य – फेसबुक)
-
लहान मुलांसमवेत दानिश.

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो