-
ईदच्या आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या या वर्षीच्या पहिल्या चित्रपटाने तिकीटबारीवर ३६.५४ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करत त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर बॉलीवूडलाही ईदची मोठी भेट दिली आहे. हरयाणवी पैलवानाची भूमिका साकारलेल्या सलमान खानने या वेळी पडद्यावर खरी खेळातली ‘अॅक्शन’ रंगवली असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, ईदच्या दिवशी सलमानने त्याच्या गॅलक्सी अपार्टमेण्ट येथून सर्व चाहत्यांना भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सलमानचे संपूर्ण खानदान ईद सेलिब्रेट करण्यासाठी गॅलक्सी अपार्टमेण्ट येथे जमले होते.
-
आपल्या चाहत्यांना हात दाखवताना सलमान.
-
दरवर्षीची ईद आणि बिग बजेट चित्रपट असे समीकरण सलमान खानने कायम यशस्वी केले असले तरी ‘सुलतान’ हा त्याच्या आधीच्या पठडीतील चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा चित्रपट आहे.
-
ईदला म्हणजे ७ जुलैला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय ऐन वेळी बदलत यशराज प्रॉडक्शनने एक दिवस आधी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका काही प्रमाणात चित्रपटाला बसला नाही तर यापेक्षा मोठा आकडा पाहायला मिळाला असता, असेही ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
-
सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा गॅलक्सी अपार्टमेण्टच्या दिशेने जाताना.
-
अरबाझ खान
-
आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह अर्पिता खान शर्मा.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”