-
झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे नवे पर्व. संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. झी नेटवर्कच्या शारदा सुंदर (कार्यकारी उपाध्यक्ष, क्लस्टर हेड – प्रादेशिक चॅनेल) बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख, झी युवा आणि झी टॉकीज) यांच्या हस्ते वाहिनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक ह्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची रंगत वाढवली. झी युवा वाहिनीच्या मालिकेतील सुहास जोशी, ज्योती सुभाष, विवेक लागु, तुषार दळवी, विजय पटवर्धन, विद्याधर जोशी, जयवंत वाडकर, सुप्रिया पाठारे, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, अभय कुलकर्णी, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, सक्षम कुलकर्णी, ओमकार गोवर्धन, विवेक सांगळे, श्रीखर पित्रे, सिद्धी कारखानीस, समीहा सुळे, रुचिता जाधव, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, शशांक केतकर, मधुरा देशपांडे, संदीप पाठक, रश्मी अनपट, मिताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे, सिध्दार्थ खिरीड, ओंकार राउत, अभय कुलकर्णी, नीरज, संचिता कुलकर्णी, केतकी पालव, स्नेहा चव्हाण, अपूर्व रांझणकर देखील या सोहळ्यास उपस्थित होते ज्यातील बऱ्याचश्या नवोदित कलाकारांना उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कलाकारांनी प्रोत्साहनदेखील दिले.
-
'श्रावणबाळ रॉकस्टार' सोमवार ते शुक्रवार संध्या ७.३० वा.
-
'लव्ह लग्न लोचा' सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा.
-
'इथेच टाका तंबू' सोमवार ते शुक्रवार रात्री ९.०० वा.
-
'फ्रेशर्स' सोमवार ते शुक्रवार संध्या ७ वाजता
-
'बन मस्का' सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वा.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल