-
रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांचा अभिनय असलेला चित्रपट 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवर टीझर शेअर केला आहे. चित्रपटात रणबीर अनुष्का आणि ऐश्वर्यासोबत 'लव्ह सीन' करताना नजरेस पडेल. रणबीर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबत इतकी हॉट आणि इंटिमेट दृश्ये साकारताना दिसणार आहे.
-
टीझर प्रसिध्द करण्याआधी करण जोहरने चित्रपटाचे दोन पोस्टर्सदेखील ट्विट केले होते. चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित करणार याबाबतचा खुलासा त्याने ही पोस्टर्स शेअर करताना केला होता. हा चित्रपट एकांगी प्रेम, घट्ट मैत्री आणि हृदय तुटण्याची कथा आहे, असा संदेश करणने टीझरसोबत लिहिला आहे.
-
रणबीरचा इंटेन्स अवतार टीझरमध्ये पाहायला मिळतो. याआधी 'रॉक स्टार' आणि 'ये जवानी है दिवानी' चित्रपटातदेखील त्याने अशाच स्वरुपाच्या भूमिका साकारल्या होत्या.
-
टीझरमध्ये फवाद खानचेदेखील दर्शन होते. केवळ एक-दोन दृश्यांमध्ये तो पाहायला मिळतो.
-
'जज्बा' चित्रपटात वेगळ्या रुपात दिसलेली ऐश्वर्या 'ए दिल है मुश्किल'च्या टीझरमध्ये कमालीची सुंदर दिसते. हा चित्रपट प्रेमाच्या त्रिकोणावर बेतण्यात आला आहे.
-
चित्रपटाचे शीर्षकगीत प्रीतमने संगीतबद्ध केले असून, अरिजीतने ते गायले आहे. चित्रपटाचे संगीत हा 'यूएसपी' आहे.
-
जवळजवळ चार वर्षांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरलेला करण जोहर त्याच्या कौटुंबिक चित्रपटांसाठी ओळखला जातो. असे असले तरी या चित्रपटात त्याने रोमँटिक ड्रामा साकारला आहे.
-
'ए दिल है मुश्किल' चित्रपटाची कथादेखील करणनेच लिहिली आहे. या वर्षी दिवाळीदरम्यान चित्रपट प्रदर्शित होईल.
-
धर्मा प्रॉडक्शनने याआधी 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'माय नेम इज खान'सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आता धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे चित्रपटरसिकांचे लक्ष लागले आहे.

Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…