-
सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्या कतरिनाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं. सोशल मीडियावर तिच्या या पदार्पणानंतर शाहरुख खान, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी तिचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यामुळे सध्या बॉलिवूडच्या या 'बँग बँग गर्ल'ला हे ऑनलाइन विश्व भावल्याचं दिसत आहे. (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)
-
ही नवी सुरुवात करत कतरिनाने काही सुरेख फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)
-
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच कतरिनाने हा फोटो पोस्ट करत #ilovesummer असं म्हणत या ऋतूचं सौंदर्य सर्वांसमोर आणलं. (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)
-
कतरिनाचे हे फोटो पाहून तुम्हीली तिच्या प्रेमात पडाल.. (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)
-
विविध चित्रपट आणि प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असणाऱ्या कतरिनाचे हे 'ऑन द गो फॅशन गोल्स' पाहिलेत का? (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)
-
सध्या कतरिना 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, या चित्रपटात ती सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. (छाया सौजन्य- कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)

Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”