-
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोमध्ये व्यग्र आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामुळे ती बरीच चर्चेत आली आहे.
-
पण, या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत तिने मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दोन दिवस आधीपासूनच या खास दिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.
-
प्रगती विद्यालयातील मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत तिने वाढदिवस साजरा केला.
-
वाढदिवस साजरा करण्याच्या बऱ्याच पद्धती असतात. त्यातही सेलिब्रिटींचे वाढदिवस म्हणजे जंगी पार्ट्या, कलाकार मित्रमंडळींची गर्दी आणि उत्साह असेच चित्र पाहायला मिळते. पण, अमृता गेल्या वर्षीपासून अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याला प्राधान्य देते.
-
वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेगळे पण, तितकेच अर्थपूर्ण सेलिब्रेशन करत हा खास दिवस साजरा करण्याचा माझा मानस होता, असे म्हणत तिने या अनोख्या सेलिब्रेशनविषयी सांगितले.

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”