-
गेल्या आठड्यापासून सोशल मीडियावर फक्त एका मुलीचीच चर्चा होताना दिसत आहे. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ‘उरू अदार लव्ह’ या मल्याळम सिनेमाची अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. असे फार क्वचित पाहायला मिळते की सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच त्या सिनेमातील अभिनेत्रीचे नाव जगभरात अनेकांच्या तोंडात असते. 'मनिक्य मलरया पूवी' या गाण्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेली प्रिया ही जगभरातील सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोवर्स मिळवणारी तिसरी सेलिब्रिटी ठरली आहे. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. भुवया उंचावण्यानेही लोक प्रसिद्ध होऊ शकतात असे तुम्हाला जर कोणी सांगितले असते तर कदाचित तुमचा विश्वास बसला नसता पण आता प्रिया वरियरने ते सिद्ध करुन दाखवलं आहे.
-
काही सेकंदाच्या या व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांमध्ये कमालिची वाढ झाली. एका दिवसात प्रियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट सहा लाखांहून अधिकांनी फॉलो केले. येत्या काळात जर तिची क्रेझ अशीच सुरू राहिली तर केली जेनर आणि क्रिस्तीयानो रोनाल्डोलाही ती मागे टाकू शकेल. यात काही शंका नाही. रिअॅलिटी टीव्ही स्टार केली जेनर हिच्या नावावर एका दिवसात सर्वात जास्त इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोवर्स येण्याचा रेकॉर्ड आहे. केलीला एका दिवसात ८ लाख ६ हजार फॉलोवर्सनी फॉलो केले.
-
दुसऱ्या स्थानावर जगप्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्तीयानो रोनाल्डोला इन्स्टाग्रामवर एका दिवसात ६ लाख ५० हजार लोकांनी फॉलो केले होते. या जगप्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया तिसऱ्या स्थानी आहे. प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एकाच दिवशी सुमारे ६ लाखांहून अधिक फॉलोवर्स तिला मिळाले आहेत. आता प्रियाचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाइडही झाले आहे.
-
प्रिया तिच्या डोळ्यांच्या हावभावांसाठी जेवढी गाजली तेवढीच ती तिच्या आवाजासाठीही प्रसिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'ऐ दिल है मुश्किल' सिनमातील 'चन्ना मेरेया' हे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
‘उरू अदार लव्ह’ सिनेमाने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण करणारी प्रिया ही मुळची केरळची आहे. या फोटोतील प्रियाच्या डोळ्यांनी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला असेल यात शंका नाही. केरळमधील पारंपरिक नृत्यप्रकार असलेल्या मोहिनीयट्टम नृत्याचे प्रियाने प्रशिक्षण घेतले आहे.

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली