भाभीजी घर पर है – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' या मालिकेमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे मध्यवर्ती भूमिकेत असून या कार्यक्रमावर पाकिस्तानात प्रदर्शित होण्यावर बंदी आहे. नागीन – 'रेस ३' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मौनी रॉय या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेचा सध्या दुसरा पर्व सुरु असून अद्यापही ही मालिका पाकिस्तानात दाखविली जात नाही. बिग बॉस- छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. मात्र शोच्या नवव्या पर्वापासून त्याचं पाकिस्तानात प्रदर्शित होणं बंद करण्यात आलं आहे. थपकी प्यार की – या मालिकेमध्ये एका मुलीचा संघर्ष आणि तिचा स्वावलंबी स्वभाव यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कुबूल है – भारतीय मुस्लिम परिवारावर आधारित ही मालिका आहे. ये है मोहोब्बते – सध्याच्या घडीला ही मालिका प्रचंड लोकप्रिय असून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. मे आय कम इन मॅडम – प्रेक्षकांचा विरंगुळा करणारी ही मालिका असून त्याचा अखेरचा भाग ४ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल