-
फॅशन जगतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या 'लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हल २०१८'ला सुरुवात झाली असून, यामध्ये अनेक फॅशन डिझायनर्स त्यांच्या डिझाईन्सने सर्वांचीच मनं जिंकत आहेत. या डिझाईन्स सादर करण्यासाठी रॅम्पवर येणारे सेलिब्रिटीसुद्धा या फॅशनवीकच्या केंद्रस्थानी आहेत. सध्या या फॅशन वीकमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनच्या अदांची चर्चा सुरु आहे.
-
'रिक्राफ्टींग ट्रेडिशनल स्किल्स' या एका बेसलाईनवर डिझायनर सुनिता शंकरने तिच्या काही डिझाईन्स सादर केल्या.
-
यावेळी सुष्मिता सेन फ्युजन प्रकारातील कांजीवरम साडीत रॅम्पवर आली.
-
हलका मेकअप आणि त्याला साजेसा लूक तिने मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी केल्याचं पाहायला मिळालं.
-
अभिनेत्री रसिका दुग्गलही गुंजन जैनच्या 'वृक्ष' या कलेक्शनला सादर करण्यासाठी रॅम्पवर आली होती. हिरव्या आणि राखाडी रंगाची मेळ असणारी आणि लाल रंगाची किनार असणारी साडी तिने नेसली होती.
-
'वृक्ष'च्या कलेक्शनमध्ये लाल, पिवळा, काळा आणि राखाडी या रंगाचा जास्त वापर पाहायला मिळाला.
-
'वेलकम टू जंगल' या कलेक्शनला सादर करण्यासाठी अभिनेता राजकुमार राव रॅम्पवर आला होता. राजेश प्रताप सिंहच्या शेरवानी आणि कुर्ता यांचा सुरेख मेळ साधल्या जाणारं कलेक्शन त्याने परिधान केलं होतं.
-
लांब स्कर्ट, मोनोक्रोमॅटीक जॅकेट आणि हाय बनची केशभूषा अशा एकंदर लूकमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीने रॅम्पवर येत सर्वांची मनं जिंकली.
-
लॅक्मेच्या रॅम्पवर यंदा अभिनेता साकिब सलीमही सर्वांचं लक्ष वेधून गेला.

Vinod Kambli: “माझ्या भावासाठी प्रार्थना करा…”, विनोद कांबळींच्या भावाने दिली त्यांच्या प्रकृतीची माहिती; म्हणाला, “बोलायला त्रास होतोय”