-
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आगामी 'जलेबी' चित्रपटात अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारत आहे. पण या चित्रपटापेक्षा रिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या जास्त चर्चेत आहे.
-
रिया चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिने महेश भट्ट यांच्यासोबतचा शेअर केलेला फोटो. महेश भट्ट यांच्या वाढदिवशी रियाने त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले.
-
हे फोटो पाहून सोशल मीडियावर रिया आणि महेश भट्ट यांची सर्वाधिक चर्चा होऊ लागली. तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का असाही प्रश्न नेटीझन्सनी सोशल मीडियावर विचारला.
-
काही युजर्सनी तर रिया- महेश भट्ट यांची तुलना अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू यांच्याशी केली. अनुप जलोटा आणि जसलीन सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. जसलीन ही अनुप जलोटा यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे.
-
टिकाकारांना न जुमानता महेश भट्ट यांच्यासोबतचा आणखी फोटो शेअर करत रियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले. 'काविळ झालेल्याला जग पिवळंच दिसतं, तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं,' अशा शब्दांत रियाने ट्रोलर्सना फटकारलं.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”