अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'झीरो' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत त्याने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तीने गोल्डन रंगाचा ड्रेस घालता होता. सारा लवकरच 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसदेखील यावेळी उपस्थित होती. सलमान खानची बहिण अर्पिता खान देखील शाहरूखच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होती. -
अभिनेत्री काजोलला देखील या पार्टीमध्ये येण्याचा मोह आवरला आहे.
'डिअर जिंदगी' चित्रपटात आलिया आणि शाहरुखने स्क्रिन शेअर केली होती. त्यामुळे शाहरुखने तिलादेखील या पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. पार्टीमध्ये आलियाने ब्लॅक ड्रेस घातला होता. शाहरुखप्रमाणेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही दिवाळीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं.यावेळी बॉलिवूडमधील अनेक तारेतारकांनी यावेळी हजेरी लावली होती. -
शिल्पा शेट्टी कुटुंबियांसोबत
लोकप्रिय अभिनेता आर.माधवनने त्याच्या कुटुंबासह शिल्पाच्या पार्टीत आला होता. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने शिल्पाच्या पार्टीत हजेरी लावली होती.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक