-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास नुकतेच विवाहबंधनात अडकले. राजस्थानमध्ये पार पडलेल्या या स्वप्नवत लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
-
शनिवारी १ डिसेंबर रोजी प्रियांका-निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले.
-
रविवारी २ डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
जोधपुरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
-
ख्रिश्चन पद्धतीनं पार पडलेल्या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर ब्रँड राल्फ लॉरेन यांनी वेडिंग गाऊन तयार केला.
-
हिंदू पद्धतीने लग्नसोहळ्यासाठी फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांनी प्रियांकासाठी लेहंगा डिझाइन केला आहे.
-
यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटींसाठी किंवा ग्राहकांसाठी राल्फ लॉरेन ब्रँडनं वेडिंग गाऊन डिझाइन केलेला नाही. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी वेडिंग गाऊन डिझाइन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
विशेष म्हणजे राल्फ लॉरेलनं स्वत: वेडिंग गाऊन तयार करण्याची इच्छा प्रियांकाकडे व्यक्त केली होती.
-
प्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. प्रियांका ३६ वर्षांची तर निक २६ वर्षांचा आहे.
-
आई मधू चोप्रा यांच्यासोबत प्रियांका
-
प्रियांकाने लग्नातल्या फोटोंचे सारे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले होते.
-
या बहुप्रतिक्षित लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं.
-
निक-प्रियांकाच्या लग्नात सारं काही खास असल्याचं दिसून आलं. -
या सोहळ्यातला कोणताही फोटो किंवा माहिती लीक होणार नाही याची पुरेपुरे काळजी प्रियांका आणि निकनं घेतली होती.
-
-

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…