-
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण
डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर या जोडीने बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी एका जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या परिवारासोबत उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे या पार्टीतील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी बिग बींसोबत पत्नी जया बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा पार्टीत सहभागी झाल्या होत्या. रिसेप्शनमध्ये बिग बींनी त्यांच्या लोकप्रिय ‘जुम्मा चुम्मा’ या गाण्यावर ठेका धरला. बिग बींसोबत डान्स करताना रणवीरचा आवडता डान्स प्रकार रॅप याची एक झलक यावेळी पाहायला मिळाली. पार्टीमध्ये कलाविश्वासोबतच क्रिडाक्षेत्रातील काही मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, बिग बी, दीप-वीरने सेल्फी काढला.

Bigg Boss 19 : गौहर खानचा दीर ते मराठमोळा कॉमेडियन; शोमध्ये सहभागी झाले ‘हे’ १६ स्पर्धक, वाचा संपूर्ण यादी…