भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे लग्नाआधीच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालं आहे. या ऐतिहासिक शहराप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून एका अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. अंबानी कुटुंबाकडून 5100 लोकांच्या जेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकांसाठी तिनही वेळा जेवण्याची सोय असणार आहे. अंबानी कुटुंबाने स्वत: लोकांना अन्न वाढलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या उदयपूरमधील नारायण सेवा संस्थानात पुढील चार दिवस अन्न सेवा सुरु राहणार आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत

“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”