'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. व्यावसायिक विकी जैनला अंकिता डेट करत असून हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. -
विकीच्या वाढदिवसानिमित्त अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांच्या फोटोंचा अल्बम पोस्ट केला आहे.
-
विविध कार्यक्रमांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं असून काही दिवसांपूर्वीच विकीने अंकितान प्रपोज केलं. प्रपोज करतानाचे फोटोसुद्धा अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
विकी जैन मुंबईतील एक व्यावसायिक आणि बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी एकमेकांजवळ आले.
-
अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेच्या सेटवरच अंकिता आणि सुशांत यांचं सूत जुळलं होतं. मात्र सहा वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
-
अंकिताने नुकतंच ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
‘विकी चांगला व्यक्ती आहे. होय, मी प्रेमात आहे आणि योग्य वेळी तुम्हाला मी माझ्या लग्नाची बातमी नक्की देईन,’ असं अंकिता एका मुलाखतीत म्हणाली होती.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय