हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीतकार,कवी,लेखक आणि दिग्दर्शक अशा विविधांगी भूमिका पार पाडणारे गुलजार यांचा आज वाढदिवस. गुलजार यांचं खरं नाव 'संपूर्ण सिंग कालरा' असं असून ते गुलजार याच नावाने प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुलजार यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. लेखणीच्या सामर्थ्याचं उत्तम उदाहरण देण्यासाठी नेहमीच गुलजार यांचं नाव पुढे केलं जातं. आर. डी. बर्मन, सलील चौधरी, विशाल भारद्वाज, ए. आर. रेहमान संगीतकारांच्या अशा अनेक पिढ्या बदलल्या, पण ‘गुलजार’ आणि त्यांचे शब्द मात्र अनेक दशके रसिकांची शाब्दिक तहान भागवत आहेत असेच म्हणावे लागेल.

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली