बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात गाजलेल्या अभिनेत्रींमध्ये महिमा चौधरीचेही नाव घेतले जाते. ‘परदेस’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता. बॉलिवूडमधून अचानक एक्झिट घेतलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखंणही कठीण झालं आहे. २०१६ मध्ये तिचा ‘डार्क चॉकलेट’ हा शेवटचा चित्रपट आला. -
महिमाने २००६ साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतरच महिमाने ती गरोदर असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ती लग्नापूर्वीच गरोदर असल्याच्या बऱ्याचशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या.
-
टेनिस प्लेयर लिएंडर पेस याच्यासोबत महिमाचे प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा होती. जवळपास सात वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
-
'परदेस'नंतर 'धडकन', 'दिल है तुम्हारा', 'बागबान', 'लज्जा', 'ओम जय जगदीश', 'सँडविच' यांसारख्या चित्रपटांमधून महिमाने तिच्या अभिनयाची छाप सोडली.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…