प्रियांका चोप्रा – बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा तिच्या विचित्र मेकअपमुळे ट्रोल झाली. मेट गाला २०१९ मध्ये प्रियांकाने केलेल्या मेकअपमुळे नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडविली होती. कंगना रणौत – बॉलिवूडची क्वीन कंगना नेहमी परफेक्ट मेकअपमध्ये पाहायला मिळते. मात्र एकदा ओव्हर मेकअप केल्यामुळे ती ट्रोल झाली होती. ऐश्वर्या राय बच्चन- बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची चर्चा विदेशापर्यंत होताना दिसते. अनेक वेळा सुंदर दिसण्यामुळे चर्चेत येणारी ऐश्वर्या एकदा तिच्या खराब मेकअपमुळे चर्चेत आली होती. राखी सावंत – सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असलेली राखी सावंत अनेक वेळा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर यापूर्वीदेखील ती बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. गौरी खान – अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान कलाविश्वामध्ये सक्रिय नसली तरीदेखील तिच्या ग्लॅमरस लूकची कायम चर्चा होते. मात्र एकदा विचित्र मेकअप केल्यामुळे ती ट्रोल झाली होती.

७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल