-
बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ म्हणजेच अनिल कपूर यांचा आज वाढदिवस. वयाच्या ६३ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असणारा हा कलाकार. अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाने मागील चार दशकांहून अधिक काळापासून प्रेक्षकांच्या हृद्यामध्ये खास स्थान मिळवले आहे. आजही त्यांचे चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असतात.
-
चित्रपटांव्यक्तीरिक्त अनिल कपूर हे ब्रॅण्ड एण्डोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतात. ब्रॅण्ड एण्डोर्समेंटमधून वयाच्या साठीमध्ये असताना कमाई करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी ते आहेत. आजही अनिल कपूर यांच्या नावाला निर्मात्यांकडून चांगली मागणी आहे. त्यामुळेच त्यांची कमाईही तितकीच आहे. चला तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या संपत्तीबद्दल…
-
४० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अनिल कपूर यांची एकूण संपत्ती ११५ कोटी रुपये इतकी आहे. अभिनयाबरोबरच ब्रॅण्ड एण्डोर्समेंट आणि खासगी गुंतवणुक ही दोन त्यांच्या कमाईची प्रमुख माध्यमे आहेत.
-
अनिल कपूर हे कमाईबरोबर समाजसेवेसाठीही मोठ्या प्रमाणात निधी देतात. त्यांच्या कमाईपैकी मोठा हिस्सा दे समाजकार्यासाठी देतात. देशातील सर्वाधिक कर देणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत.
-
अनिल कपूर यांची मुंबईमध्ये तीन घरं आहेत. त्यांच्या जुहू येथील घराची किंमत ३० कोटींच्या आसपास आहेत.
-
अनिल कपूर यांच्या मुंबईतील इतर दोन घरांची किंमत ५ कोटींच्या आसपास आहे. याशिवाय देशभरात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे.
-
अनिल कपूर यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. यामध्ये पॉर्शे, बेन्टली, बीएमडब्ल्यू, जॅग्वार आणि ऑडीसारख्या गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील सर्व गाड्यांची एकूण किंमत नऊ कोटी रुपये इतकी आहे.
-
अनिल कपूर यांच्याकडे असणाऱ्या मर्सिडीज बेन्झ एम एल ३५० या गाडीची किंमत ६० लाख रुपये इतकी आहे.
-
मर्सिडीज बेन्झ एस क्लास ही अनिल कपूर यांच्याकडे असणाऱ्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. या गाडीची किंमत १ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे.
-
अनिल कपूर यांच्याकडे असणारी बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज ही गाडी एक कोटी २६ लाखांची आहे.
-
ऑडी आरएस सेव्हन ही अनिल कपूर यांच्याकडील सर्वात महागडी गाडी आहे. या गाडीची किंमत २ कोटी इतकी आहे.
-
अनिल कपूर यांची वर्षाची कमाई ८ ते १० कोटी इतकी असल्याचे समजते.

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”