-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी ५४ वा वाढदिवस आहे. टायगर ऑफ बॉलीवूड, ब्लॉकबस्टर खान, बॉक्स ऑफिस किंग, भाईजान, सल्लू यांसारखी अनेक विशेषण सलमानच्या नावापुढे लावण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षात सलमानने रोमान्सपासून ते कॉमेडीपर्यंत, अॅक्शन ते दुहेरी भूमिकेपर्यंत असं कोणतचं काम नसेल जे त्याने करून पाहिलं नाही. स्टाइल असो वा पिळदार शरीरयष्टी किंवा वादग्रस्त प्रेमप्रकरण यांसारख्या अनेक कारणांमुळे तो नेहमीच लाइमलाइटमध्ये असतो.
-
सलमानने खानने १९८८ साली प्रदर्शित झालेल्या बिवी हो तो ऐसी चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहकलाकार म्हणून काम केले. सूरज बरजातयाच्या १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्याने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
-
माधुरी दीक्षितसोबतच्या हम आपके है कौन चित्रपटातून सलमान पुन्हा एकदा यशाच्या शिखऱावर पोहचला. सूरज बरजातया दिग्दर्शित हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता.
-
सलमान खान आणि त्याची आई सलमा खान.
-
अरबाज खानने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यात अरबाज, सलमान आणि सोहेल दिसत आहेत.
-
खान ब्रदर्स आणि त्यांचे वडिल सलीम खान.
-
सलमानने दिग्दर्शक संजय लीला भन्सालीसोबत खामोशी आणि हम दिल दे चुके सनम हे दोन चित्रपट केले.
-
दिग्दर्शका, नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि सलमानचा एक दुर्मिळ फोटो.

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम