-
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. आज अपूर्वाचा वाढदिवस आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ ला मुंबईच्या दादर येथे झाला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वा दादरमध्येच लहानाची मोठी झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
किंग जॉर्ज विद्यालयातून अपूर्वाने दहावीपर्यंचे शिक्षण घेतलं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाच्या वडिलांचे नाव सुभाष नेमळेकर आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाच्या आईचे नाव सुप्रिया नेमळेकर आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाला दोन भावंडे आहेत. अपूर्वाच्या भावाचे नाव ओंकार आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाचं नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाकडे मालिकेसाठी विचारणा झाली होती. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
कॉलेजमध्ये असताना मालिका करण्यास तिने ती नाकार दिला होता. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच अपूर्वाला ‘आभास हा’ मालिकेतील आर्या नावाच्या मुख्य नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आयरिश निर्मिती संस्थेकडून विचारणा झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
‘आभास हा’ मालिकेतील व्यक्तिरेखा अपूर्वाच्या वयोगटातल्या मुलीची असल्यामुळे तिने या भूमिकेसाठी होकार दिला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वा व्यवस्थापनशास्त्रातील पदवी संपादन केली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
व्यवस्थापनशास्त्रातील पदवीनंतर एमबीए करण्याचा मानस असलेल्या अपूर्वाने स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत असतानाच दुसरीकडे अपूर्वाने अभिनय करणे सुरुच ठेवले. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वा ही सोशल नेटवर्किंगवर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी अनेकदा इनस्ताग्रामवरुन फोटो शेअर करत असते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
इन्स्ताग्रामवरुन अपूर्वी स्वत:च्या वेगवेगळ्या फोटो शूटचे, सेटवरील धम्माल करण्यासंदर्भातील फोटो शेअर करते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
‘झी मराठी’च्या ‘आभास हा’ या मालिकेतून अपूर्वाने अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाने ‘भाखरवाडी ७ किमी’, ‘इश्कवाला लव्ह’सारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वा ही दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांना तिचे गुरू मानते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटामध्ये अपूर्वाने काम केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
२०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कार अपूर्वाने जिंकला आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
'झी मराठी'वरील 'एका पेक्षा एक, जोडीचा मामला', 'कलर्स मराठी'वरील 'तू माझा सांगाती', 'झी मराठी'वरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकांमध्येही अपूर्वाने काम केलं आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वाला वेगवेगळे पदार्थ खाण्याची प्रचंड आवड आहे. तीने मध्यंतरी मालिकेच्या सेटवर सहकालारांसाठी चिकन पार्टीचे आयोजन केले होते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
'रात्रीस खेळ चाले २'मध्ये अपूर्वाने साकारलेली शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी चांगलीच चर्चेत आली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
विराट कोहली हा आवडता क्रिकेटपटू, श्रेया घोषाल ही आवडती गायिका, शिल्पा शेट्टी आणि श्रीदेवी कपूर या अपूर्वाच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक