-
रणबीर कपूर- आलिया भट्ट : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली जोडी रणबीर-आलिया गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.
-
वरुण धवन- नताशा दलाल : या वर्षभरात वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगल्या. ही जोडी नवीन वर्षाचं स्वागत स्वित्झर्लंडमध्ये करणार आहे. वरुण-नताशासोबतच करिना कपूर खान, करिश्मा कपूर, अनुष्का शर्मा- विराट कोहली हेसुद्धा स्वित्झर्लंडमध्येच सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.
-
अहान शेट्टी- तानिया श्रॉफ : बॉलिवूडमध्ये नव्याने चर्चेत आलेली ही जोडी लंडनला रवाना झाली आहे. लंडननंतर पेरु आणि त्यानंतर अॅमेझॉन जंगललाही ही जोडी भेट देणार आहे.
-
अथिया शेट्टी-के.एल.राहुल : सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया आणि क्रिकेटर के. एल. राहुल हे मित्रमैत्रिणींसोबत थायलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत. हे दोघं सोशल मीडियावर फोटोसुद्धा पोस्ट करत आहेत.
-
कतरिना कैफ-विकी कौशल : कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशी रवाना झाले आहेत. पण अद्याप ठिकाण कोणतं हे स्पष्ट नाही.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय