-
'छपाक' आणि 'तान्हाजी' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. परंतु 'छपाक'च्या तुलनेत 'तान्हाजी'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी 'छपाक'ने पाच कोटी रुपयांची कमाई केली तर दुसरीकडे 'तान्हाजी'ने १५ कोटी रुपयांची कमाई केली.
-
ऐतिहासिक चित्रपट – 'तान्हाजी' एक ऐतिहासिकपट आहे. आणि ऐतिहासिक चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही काळात प्रदर्शित झालेले 'मणिकर्णिका', 'पद्मावत', 'पानिपत', 'बाजिराव मास्तानी' यांसारख्या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली. अगदी प्रदर्शनापुर्वी या चित्रपटांवरुन प्रचंड गोंधळ माजला होता. परंतु त्याचा या चित्रपटाच्या कमाईवर फारसा फरक पडला नाही.
-
स्टारकास्ट – 'तान्हाजी' एक मल्टिस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, देवदत्त नागे यांसारखे गर्दी खेचणारे सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार आहेत. तर दुसरीकडे 'छपाक'मध्ये दीपिका पदूकोण सोडली तर फारसा कोणी मोठा कलाकार नाही. परिणामी प्रेक्षकांचा कल 'तान्हाजी'च्या दिशेने जाताना दिसत आहे.
-
चित्रपट पाहाण्यावर बंदी – दीपिका पदुकोणने जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला होता. परंतु तिच्या या भूमिकेशी सहमत नसलेल्या मंडळींनी 'छपाक'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे असा कुठलाही प्रकार 'तान्हाजी'च्या बाबतीत घडला नाही.
-
वाद-विवाद – 'छपाक' प्रदर्शनापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सुरुवातीला छपाकच्या दिग्दर्शकांवर संहिता चोरीचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या नावावरुन विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
-
तान्हाजी मालुसरे – तान्हाजी मालुसरे या नावाचे वलय 'छपाक'वर भारी पडले. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारतीयांवर नेहमीच प्रभाव राहिला आहे.
-
-
पुरुषप्रधान विरुद्ध स्त्रीप्रधान चित्रपट – भारतीय प्रेक्षक स्त्रीप्रधान चित्रपटांच्या बाबतीत फारसे उत्साही दिसत नाहीत. कारण आपल्या देशात निर्माण होणाऱ्या जवळपास प्रत्येक चित्रपटात स्त्री पात्रे केवळ सहाय्यक कलाकाराच्याच भूमिकेत झळकताना दिसतात.
-
'मदर इंडिया', 'बँडिड क्विन', 'मर्दानी' असे काही अपवादात्मक चित्रपट सोडले. तर इतर सर्व स्त्रीप्रधान चित्रपटांना फारसे यश मिळालेले नाही. 'छपाक' हा देखील एक स्त्री प्रधान चित्रपट आहे. त्यामुळे बहुदा या चित्रपटाबाबत प्रेक्षक फारसे उत्साही दिसत नाहीत.
-
अॅक्शन विरुद्ध ड्रामा – 'छपाक' एक ड्रामा पॅटर्न चित्रपट आहे. तर दुसरीकडे तान्हाजी एक अॅक्शनपट आहे. अॅक्शनपटांना बॉलिवूडमध्ये नेहमीच चांगली मागणी असते.
-
आपल्या देशातील बहुसंख्य प्रेक्षकांना झगमग गाणी, हायवॉल्डेज ड्रामा, जोरदार अॅक्शन असे मसालेदार चित्रपट पाहायला आवडतात.
-
तान्हाजी देखील असाच एक अॅक्शन सीन्सने भरलेला ऐतिहासिकपट आहे. त्यामुळे अॅक्शन विरुद्ध ड्रामा या स्पर्धेत सध्या अॅक्शनपट बाजी मारताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”