-
उरी येथे घडलेल्या सत्यघटनेवर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाला ११ जानेवारी रोजी एक वर्ष झालं. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेलेल्या विकी कौशलनं काही फोटोस शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकी कौशल भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानं आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
एका तासात या फोटोंना लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या चित्रपटात विकी कौशलनं मेजर विहान सिंग शेरगिल यांची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलंय की आमच्या सर्वांकडून तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही आमच्या चित्रपटाला जे प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे आभार. आमची टीम कायमच तुमची आभारी राहिन. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या फोटोत विकी कौशल आपल्या क्रू मेंबर्ससोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटानं विकी कौशल खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. या चित्रपटात मोहित रैना यांनी करण कश्यप यांची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटानं सर्वांची वाहवा मिळवली होतीच. तसंच बॉक्स ऑफिसवरही तगडी कमाई केली होती. २५ कोटी रूपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ३४२.६ कोटी रूपयांची कमाई केली होती. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख