-
भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस 'सैन्य दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आज आपण भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमावर आधारित TOP 10 चित्रपट पाहाणार आहोत.
-
उरी द सर्जीकल स्ट्राईक – भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले होते. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.
-
प्रहार – नाना पाटेकर आणि माधुरी दिक्षित यांच्या जबरदस्त जुगलबंदीमुळे 'प्रहार' हा चित्रपट गाजला होता. १९९१ साली प्रदर्शित झालेला 'प्रहार' भारतीय सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
-
बॉर्डर – १९९७ साली प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' हा चित्रपट १९७१ साली भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित होता. सुनील शेट्टी, सनी देओल, अक्षय खन्ना जॅकी श्रॉफ यांसारखे अनेक नामांकीत बॉलिवूड अभिनेत्यांनी या चित्रपटात काम केले होते.
-
थुप्पकी – २०१२ साली प्रदर्शित झालेला थुप्पकी हा एक दाक्षिणात्य चित्रपट होता. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय याने मुख्य व्यक्तिरेखी साकारली होती. एका भारतीय सैनिकाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता.
-
हक़ीक़त – १९६२ साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले होते. हक़ीक़त हा चित्रपट याच युद्धावर आधारित आहे.
-
लक्ष – लक्ष हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार ह्रतिक रोशन याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट १९९९ साली भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित होता.
-
1971 – हा १९७१ साली भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित होता. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी आणि रवि किशन यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.
-
द गाज़ी अटॅक – हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले होते. दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबत्ती याने या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.
-
विजेता – हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.
-
सूर्या – हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सामर खान यांनी केले होते. एका भारतीय सैनिकाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
-
पलटन – हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'पलटन' हा चित्रपट भारत विरुद्ध चीन युद्धावर आधारित आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”