-
मेहेक चहल आणि अश्मित पटेलची बिग बॉसच्या सेटवर ओळख झाली. पाच वर्ष दोघे एकत्र होते. २०१७ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. २०१८ मध्ये त्यांचे लग्न होणार होतं. लग्नाची जागाही ठरली होती. पण अचानक दोघांचा साखरपुडा मोडल्याचं जाहीर झालं.
-
चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी विवेक ओबेरॉयचा गुरप्रीत गील बरोबर साखरपुडा झाला होता. पण लवकरच त्यांचे नाते संपुष्टात आले. २०१० साली प्रियांका अल्वाबरोबर लग्न करण्याआधी ऐश्वर्या रायबरोबर त्याचे नाव जोडले गेले होते.
-
राखी सावंत प्रमाणे रतन राजपूतनेही स्वयंवरमधून अभिनवला निवडले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण शो संपल्यानंतर त्यांचा साखरपुडा मोडला.
-
बिग बॉसच्या सेटवर उपेन पटेल आणि करिष्मा तन्नामध्ये प्रेम जुळले. त्यांचा साखरपुडाही झाला होता. पण हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.
-
२००२ साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर यांचा साखरपुडा झाला. अचानक फेब्रुवारी २००३ मध्ये दोघांचे नाते संपुष्टात आल्याचे समोर आले. अभिषेक आणि करिष्माचे ब्रेकअप त्यावेळी एक मोठी बातमी ठरली होती.
-
शिल्पा शिंदे आणि रोमित राज सेटवर असताना परस्परांच्या प्रेमात पडले. २००९ साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिड डे च्या वृत्तानुसार लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण शिल्पाने अखेरच्या क्षणी लग्नाला नकार दिला.
-
टीव्ही शो मध्ये मल्लिका शेरावतने विजय सिंहची जोडीदार म्हणून निवड केली होती. ती त्याच्याबरोबर लग्न करणार होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण वर्षभराने दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या.
-
'राखी का स्वयंवर' या टीव्ही शो मधून राखी सावंतने इलेश पारुजनवालाची निवड केली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण लवकरच दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
-
अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेरचा प्रिया सिंह बरोबर २०१६ मध्ये साखरपुडा झाला होता. पण काही महिन्यातच हे लग्न मोडले.
-
-
सलमान खानचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय असते. आतापर्यंत वेगवेगळया अभिनेत्रींबरोबर सलमानचे नाव जोडले गेले आहे. मिड डे च्या वृत्तानुसार १९९४ साली संगीता बिजलानीबरोबर सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या. पण सलमान अजूनही बॅचलरच आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”