-
राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी सुपरहिट ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट फरहानच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. फरहानसाठी हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटात मिल्खा सिंग यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला.
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महिंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. क्रिकेट प्रेमींच्या लाडक्या ‘कॅप्टन कूल’चा प्रवास नक्कीच पाहण्यासारखा होता. ‘एमएस धोनी..’ हा २०१६ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता.
-
जाहिरात दिग्दर्शक म्हणून ठसा उमटवलेल्या राम माधवानीचा दिग्दर्शक म्हणून असलेला पहिलाच प्रयत्न, प्रसून जोशीच्या लेखणीतून उतरलेली गाणी आणि विशाल खुराणा या तरुण संगीतकाराने दिलेले संगीत अशा पहिलेवहिलेपणातून उतरलेला ‘नीरजा’ चित्रपट इतिहासात अविस्मरणीय कलाकृती ठरला आहे.
-
प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर ‘मेरी कोम’ नावाचाच चित्रपट निर्माण करण्यात आला.‘‘माझ्या प्रत्येक पदकामागे एक वेगळा संघर्ष आहे,’’ हे एमसी मेरी कोमचे वाक्य किती बोलके आहे, याची प्रचीती तिच्या जीवनातील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर नजर टाकताना येतेच.
-
‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता (तिकडचा उच्चार स्मिथा) हिच्या आयुष्यावर आहे.
-
इरफान खानची प्रमुख भूमिका असलेल्या पानसिंग तोमर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
-
‘बॅन्डिट क्वीन’ – चंबळची डाकू फुलन देवीच्या आयुष्यावर आधारित 'बॅन्डिट क्वीन' हा सिनेमा आहे.
-
स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारा ‘दंगल’ हा सिनेमा आहे. या सिनेमात झायरा आणि सुहानी या दोन्ही बालकलाकारांनी गीता-बबिताची भूमिका उत्तमपणे वठवली आहे.
-
'बोस: द फरगॉटन हिरो' हा सिनेमा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात सचिन खेडेकर यांनी नेताजींची भूमिका केली होती.
-
पाकिस्तानमधील कारागृहात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाच्या जीवनावर आधारित आहे.
-
‘रंग रसिया’ चित्रपट एकोणिसाव्या शतकातील महान चित्रकार राजा रवि वर्माच्या आयुष्यावर आधारीत आहे.
-
'द लेजंड ऑफ भगत सिंग' (२००२)- इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास आणि त्यांच्या देशप्रेमाचे या चित्रपटामध्ये चित्रण केले आहे. अभिनेता अजय देवगणने या चित्रपटामध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती.
-
अलिगढ – समलिंगी असल्याच्या भीतिपायी एका अलिगढ विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरास या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले, त्याची वास्तव कहाणी. मनोज वाजपेयी प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत.
-
आपल्या खेड्यातील लोकांना दळणवळणाचा सोपा मार्ग मिळावा यासाठी दशरथ मांझीने एकट्याने १९६० ते १९८२ या २२ वर्षाच्या कालावधीत डोंगर पोखरून ३० फुट रुंदीचा ३६० फुटाचा रस्ता तयार केला होता. त्यामुळे त्यांची ‘माऊंटन मॅन’ अशी ओळख निर्माण झाली होती. या चित्रपटात दशरथ मांझींच्या भूमिकेतील नवाझुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पाडला आहे.
-
अवघ्या पाच वर्षांच्या वयात ओडिसात राहणाऱ्या बुधिया अवुगा सिंग या मुलाचे कर्तृत्त्व पाहून भल्याभल्यांना त्याचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही. वयाच्या फक्त पाचव्या वर्षी तब्बल ४८ मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेल्या आहेत. बुधियाच्या जीवनावर बॉलीवुडमध्ये ‘बुधिया सिंग: बॉर्न टु रन’ हा एक चरित्रपट साकारण्यात आला आहे.
-
दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटमय आयुष्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाला शासनातर्फे सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या ‘कै. दादासाहेब फाळके पारितोषिका’ने गौरविण्यात आले.
-
‘पूर्णा’ हा सिनेमा पूर्णा मालवात या मुलीच्या आयुष्यावर बेतला आहे. पूर्णा मालवातने केवळ १३ व्या वर्षी माऊंट एवरेस्ट सर केले होते. जे आपल्या स्वप्नांच्या मागे जातात त्यांच्यासाठी हा सिनेमा फार प्रेरणादायी आहे.
-
स्वातंत्र्य सेनानी गौर हरी दास यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
-
गँगवॉरच्या पटावरील या अतिशय महत्त्वाच्या प्याद्याच्या आयुष्यावर दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘डॅडी’ या चित्रपटातून केला. दगडी चाळीतून सुरु झालेला गवळीचा प्रवास अंडरवर्ल्डपर्यंत कसा जाऊन पोहोचला याची मांडणी त्याने या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला.
-
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या हा चित्रपट आधारित आहे.
-
आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर ‘सुपर ३०’ हा चित्रपट आधारित आहे.
-
‘ठाकरे’ हा सिनेमा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारीत आहे.
-
संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई केली.
-
सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे यंत्र तयार करणाऱ्या मुरूगनथम यांचे नाव सर्वपरिचित आहे. त्यांच्या जीवनावर अक्षयकुमार यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आधारित आहे.
-
स्वातंत्र्य भारताला ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यासाठीचं स्वप्न पाहणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीच्या स्वप्नांचं प्रभावी चित्रण ‘गोल्ड’मधून करण्यात आलं आहे.
-
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे.
-
अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपट आहे.
-
ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
-
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या आयुष्यावर असलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल.
-
‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटामार्फत दिग्दर्शकाने शालेय पुस्तकांमधून आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
-
काशिनाथ घाणेकर म्हणजे मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार. या माणसाच्या आयुष्यावर सिनेमा काढण्यासाठी धाडस लागणार हे निश्चित. ते धाडस दाखवण्यात आलं, ‘ … आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या निमित्ताने. या सिनेमात सुबोध भावेने काशिनाथ घाणेकरांचं पात्र साकारलं आहे.
-
सआदत हसन मंटो या लेखकाच्या कथांमधील व्यापकता सध्याच्या तरुणाईपर्यंत ‘मंटो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवली आहे.
-
डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट आहे.
-
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख