बॉलिवूडमधील खान, कपूर हे परिवार चाहत्यांसाठी काही नवीन नाहीत. त्यांच्या पिढ्यानपिढ्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याप्रमाणेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं एकमेकांशी बहिण-भावाचं, आई-मुलीचं, वडील-मुलांचं किंवा भावा-भावांचं नातं आहे. परंतु यातील काही कलाकार हिट ठरले तर काही फ्लॉप झाले. कलाविश्वातील अशाच काही हिट आणि फ्लॉप झालेल्या तीन-तीन भावंडांच्या जोड्या पुढीलप्रमाणे (सौजन्य : सोशल मीडिया) – १. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशी कपूर : कलाविश्वामध्ये कपूर परिवाराचं फार मोठं योगदान आहे. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशी कपूर यांनी कलाविश्वामध्ये कपूर परिवाराचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. राज कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या. तर शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक या जबाबदाऱ्या पार पाडल्या. (सौजन्य : सोशल मीडिया) २. किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार – किशोर कुमार हे नाव कोणाला ठावूक नसेल तर नवलंच आहे. किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या गाण्याने आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे त्यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ अनुप कुमार आणि अशोक कुमारदेखील कलाविश्वात सक्रिय होते. या तिघांनीही 'चलती का नाम गाडी' या चित्रपटामध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. (सौजन्य : सोशल मीडिया) ३. ऋषी कपूर, राजीव कपूर आणि रणधीर कपूर : कपूर घराण्याची मुले रणधीर कपूर, राजीव कपूर आणि ऋषी कपूर हे तिघे भाऊ आजही बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर पाय रोवून उभे आहेत. या ऋषी कपूर हे वयाच्या ६७ व्या वर्षीही कलाविश्वामध्ये कार्यरत आहेत. तसंच सोशल मीडियावरही ते चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. (सौजन्य : सोशल मीडिया) ४. अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर : या तीन भावंडांपैकी दोन भाऊ हे उत्तम अभिनेते आहेत. तर एक जण लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आहे. संजय आणि अनिल कपूरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरकडे आजही एव्हरग्रीन अभिनेता म्हणून पाहिलं जातं. (सौजन्य : सोशल मीडिया) ५.अमरीश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी : बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक म्हणून अमरीश पुरी ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतरही ते आज त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमुळे चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्याचा भाऊ चमन पुरी यांनी अनेक चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर तिसरा भाऊ मदनने अनेक वर्षे चित्रपटांमध्ये एक चांगला कलाकार म्हणून काम केलं. (सौजन्य : सोशल मीडिया) ६. देव आनंद, चेतन आनंद आणि विजय आनंद : सदाबहार अभिनेता कोणता असा प्रश्न विचारल्यावर आपोआपच देवानंद यांचं नाव ओठांवर येतं. अनेक चित्रपट गाजवलेल्या देव आनंद यांचे दोन्ही भाऊदेखील या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे भाऊ चेतन हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. तर विजय आनंद हेदेखील एक अभिनेता होते. मात्र त्यांचे फारसे चित्रपट हिट ठरले नाहीत. (सौजन्य : सोशल मीडिया) ७. सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान : सलमान, सोहेल आणि अरबाज या भावंडांची जोडी अत्यंत लोकप्रिय आहे. सलमान आज चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे. तर अरबाज मात्र सलमान इतका यशस्वी ठरु शकला नाही. मात्र त्याने चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्धी मिळविली. तसंच सोहेलदेखील काही काळापासून अभिनयापासून दूर आहे. (सौजन्य : सोशल मीडिया)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…